इस्राईलच्या नसानसांत भिनलेल्या, नवतापूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या आदिम प्रेरणेचा इस्रायली किमयागार हे पुस्तक वेध घेतं. याच प्रेरणेद्वारे इस्राईलमुळे जागतिक पातळीवर विविध क्षेत्रांतल्या सुधारणांना कशी चालना मिळाली, याचा विस्तृत आढावा घेतं. उद्योजक, व्यावसायिक व नेत्यांनी तर हे पुस्तक वाचावंच; त्याचबरोबर एखादी नवकल्पना प्रत्यक्षात कशी साकार होते, हे समजून घेण्याची इच्छा असलेल्यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचावं.