Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



Chhatrapati Sambhaji Maharajanchi Rajneeti (Marathi) (Hard Cover, All Colour)

Menakabooks2

Regular price Rs. 950.00

Shipping calculated at checkout.

Please Note: The Book will be delivered after 15 September 2020.

‘I need to fulfil what Rajarshi Abasaheb (Chhatrapati Shri Shivaji Maharaj) intended’

This was a solemn vow with which Chhatrapati Sambhaji Maharaj ruled the Maratha kingdom. Soon after Chhatrapati Shivaji Maharaj’s death, Aurangzib stormed into the Deccan province with the Mughal army of five lakh+. His intention was to conquer Deccan and eventually the entire India. Chhatrapati Sambhaji Maharaj carried out his duty of defending the Maratha Kingdom by fighting against Aurangzib unceasingly. 

During his nine-year reign, Chhatrapati Sambhaji Maharaj focused on all fronts of the Kingdom and tried to keep the subjects happy by providing and protecting them. This book covers Chhatrapati Sambhaji Maharaj’s polity through administrative, economic, political and military aspects. The book extensively talks about Chhatrapati Sambhaji Maharaj’s governance, revenue system, economy, trade and industry, currency system, watans and inams, religious policies, and his unprecedented sacrifice.

This broad subject required extensive research. Young historian Dr. Kedar Mahadevrao Phalke got himself deeply involved in the research for this topic and penned down the most authentic book on the principals and policies of Chhatrapati Sambhaji Maharaj. The author emphasized on studying the unexplored aspects of Chhatrapati Sambhaji Maharaj’s reign. 

Published by Bhandarkar Oriental Research Institute with generous support from Infosys Foundation, this book is being presented on the occasion of 60th Anniversary of Maharashtra State. 

 

`राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य`

या ध्येयाने प्रेरित होऊन छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार केला. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर औरंगजेब पाच लक्ष मुघलांची फौज घेऊन संपूर्ण हिंदुस्थान जिंकण्याच्या हेतूने दख्खनमध्ये उतरला. त्याच्याशी अव्याहतपणे सामना करीत मराठ्यांच्या राज्याचे संरक्षण करण्याचे कर्तव्य संभाजी महाराजांनी प्राणपणाने पार पाडले. संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत राज्याच्या सर्व आघाड्यांवर लक्ष देत प्रजेच्या रक्षणाबरोबर तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराजांची राजनीती ही वेगनेगळ्या राजनैतिक, प्रशासकीय, आर्थिक, लष्करी अशा पैलूंनी व्यापलेली आहे.


`संभाजी महाराजांची राजनीती' हा व्यापक विषय असून या विषयावर विस्तृत संशोधनाची आवश्यकता होती. तरुण इतिहास संशोधक डॉ. केदार महादेवराव फाळके यांनी संभाजी महाराजांच्या राजनीतीचा अभ्यास करून `छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती' हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ मुख्यतः प्राथमिक साधनांवर आधारलेला आहे. संभाजी महाराजांच्या काळातील साधनांची खूप कमी प्रमाणात चिकित्सा झाली आहे. महाराजांच्या कारकीर्दीतील राजकीय घडामोडी आणि युद्धशास्त्रीय घटनांव्यतिरिक्त इतर घटकांचा कमी प्रमाणात अभ्यास झाला आहे. संशोधनाच्या दुर्लक्षित झालेल्या पैलूंचा अभ्यास करण्यावर डॉ. फाळके यांनी ग्रंथामध्ये मुख्य भर दिला आहे. या ग्रंथामध्ये प्रामुख्याने संभाजी महाराजांची राजनीती, राज्यकारभार, महसूल व्यवस्था, लष्करी व्यवस्था, अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगधंदे, चलनव्यवस्था, वेतने आणि इनामे, धार्मिक धोरणे आणि बलिदान अशा विविध घटकांचा समावेश झाला आहे.