एटीकेटी
भीमराज पालकर
साल २००१...
नगर- बीड सीमेवरच्या कुण्या गावातनं अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुण्याबाहेरच्या ग्रामीण भागातल्या महाविद्यालयात अर्जुन कुंभार आलाय. पुण्यात बारावी होऊन बाहेर फेकला गेलाय. शहरातलं कॉलेज आणि शहराबाहेरचं कॉलेज हा फरक डोक्यात ठेवूनच प्रवेश घेऊन, पुढे मात्र तिथलाच झालाय. बरं, तिथला झालाय म्हणजे आता कसलीही भीती नाही असं नाही... तिथूनही फेकला जाण्याची भीती... ज्या नातेवाइकांकडे राहून शिकतोय, त्यांना खरं सांगण्याची धास्ती... दर महिन्याला मेसचे पैसे मागायची लाज... लग्नाअगोदर एखादी मुलगी मिळणारच नाही का, हा प्रश्न... इंजिनीअरिंग ड्रॉईंग जमत नाही, हे सत्य... सगळे मित्र मित्रासारखे का नसतात, ही चिडचिड... नापास होऊन गावाकडे गेलो तर काय, हा यक्षप्रश्न... या सगळ्यातून जाणारी वाट आणि जगण्याच्या सुरुवातीच्या टप्प्याचा निकाल म्हणजे ‘एटीकेटी’!
An exhiliarating novel by the IT professional Bheemraj Palkar.