Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



Aai-Baba Hotana...Saath Ayurvedachi (आई-बाबा होताना... साथ आयुर्वेदाची!)

Menaka Prakashan

Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00

Shipping calculated at checkout.

नवदाम्पत्याला आवर्जून भेट द्यावे असे पुस्तक म्हणजे 
‘आई-बाबा होताना... साथ आयुर्वेदाची!’


आजच्या युगात प्रत्येकाच्या जीवनाचा लसावि अनिश्चितता, अस्थैर्य, असुरक्षितता या तीन गोष्टींत सामावलेला आहे. जीवनातील असीम आनंदाच्या क्षणावरही चिंता आणि काळजीचे मळभ असते. याचे प्रमुख कारण, त्या आनंदाच्या क्षणांना अधिक आनंददायी बनविण्यासाठीची चौफेर माहिती आपल्यापाशी नसते. आपल्या संस्कृतीत बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेण्यापासून त्याच्या संगोपनापर्यंतच्या प्रक्रियेचा सखोल विचार केला आहे. आई आणि बाबा यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्याची उजळणी व्हायला पाहिजे. बाळ जन्मण्याचा चहूअंगाने वेध घेतलेले ‘आई-बाबा होताना... साथ आयुर्वेदाची!’ हे वैद्य सौ. वरदा व वैद्य मिहीर वाचासुंदर या दाम्पत्याचे पुस्तक मार्गदर्शक आहे. आजच्या भाषेत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक, उद्याच्या समृद्ध मनुष्यबळासाठी मौल्यवान आहे. 

लेखक - 

वैद्य सौ. वरदा वाचासुंदर, एम.डी. (आयुर्वेद) 
वैद्य मिहीर वाचासुंदर, एम.डी. (आयुर्वेद)