Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.Vital Samwad

Menakabooks

Sale price Rs. 275.00 Regular price Rs. 299.00

Shipping calculated at checkout.

व्हायटल संवाद

इतिहासाचा आणि वर्तमानाचा अन्वयार्थ लावतानाच भविष्याचा मर्मग्राही वेध घेऊ पाहणाऱ्या, काळाचा विस्तृत पट उलगडणाऱ्या अकरा मुलाखती...

प्रस्तुत मुलाखत संग्रहामध्ये महाराष्ट्रातील ११ प्रख्यात लेखक, विचारवंतांच्या मुलाखती वाचकांसमोर ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ‘दशकवेध’ या विभागात गेल्या दशकाचा व्यापक आढावा, आणि येत्या दशकातील संधींचा, आव्हानांचा आणि प्रगतीच्या शक्यतांचा वेध ६ मान्यवरांच्या मुलाखतींच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

‘महाराष्ट्रवेध’ नावाच्या दुसऱ्या विभागात, विविध क्षेत्रातील ५ ख्यातनाम लेखक, विचारवंतांच्या मुलाखतींचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या सामाजिक, राजकीय, वैचारिक वाटचालीचा समर्पक आढावा या मालिकेत घेण्यात आला आहे. तसेच भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, महाराष्ट्राने विविध क्षेत्रात कोणत्या दिशेने प्रगती करायला हवी, याबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.