Khaki Stories-
Niranjan Medhekar
इन्स्पेक्टर किरण देशमुखच्या ४ थरारक कथा
लेखक - निरंजन मेढेकर
पोलिसी तपासकथा उत्कंठावर्धक असतातच, परंतु डिजिटल युगात गुन्ह्यांचा सारीपाटच बदलला गेलाय. अर्थात, तपासाचं तंत्रही बदलून गेलंय. गुन्ह्याची शस्त्रं आणि क्लृप्त्या बदलल्या, तसा त्यांचा माग काढण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल झाला. गुन्हेगारीच्या विकृतीला आता अत्याधुनिक गॅजेट्सची साथ लाभलेली आहे. मनोरंजन आणि उपयुक्तता असलेली गॅजेट्स प्रत्येकाच्या हातात आल्यामुळे त्यांच्यावर जाळं फेकण्याऱ्यांची कमी नाही. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना हातोहात ‘मामा’ बनवण्याचे फंडे विकसित झालेले आहेत. या गुन्ह्यांचं स्वरूप चक्रावणारं आणि विजेच्या वेगानं कवेत घेणारं आहे. तपासयंत्रणांच्या बुद्धीचा कस पाहणाऱ्या या गुन्ह्यांचं आव्हान आक्राळविक्राळ आहे. या पार्श्वभूमीवर गुंतागुंतीच्या केसेसचा लीलया फडशा पाडणाऱ्या इन्स्पेक्टर किरण देशमुख आणि त्यांच्या टीमच्या कौशल्याचा चित्तथरारक वेध घेणाऱ्या खाकी वर्दीतल्या तपासकथा एक कडक सॅल्यूट ठोकायला भाग पाडतील.