- जलसंगोपनक्षम समाज उभा करण्यासाठी पाण्याचे संरक्षण, वापरातील काटकसर, पुनर्वापर, संवर्धन, गुणवत्ता हे सारे पैलू आत्मसात करून संघटितपणे दीर्घकाळ काम करणारा प्रगतीशील समाज हवा आहे. त्यासाठी या पुस्तकाचे योगदान फार महत्त्वाचे ठरेल. - माधवराव चितळे
- या पुस्तकात अतिशय सुंदर आणि कल्पकतेने सर्वच व्यक्तींनी केलेले कार्य स्पष्ट केले आहे. कदाचित पाणी योद्ध्याच्या बाबतीत अशा प्रकारचे लिखाण प्रथमच होत असेल. - डॉ . कृष्णा लव्हेकर, I.A.S. (नि.) (Retd. Sect.Agricultural Ministry, Govt. of Maharashtra) (Director, (SIRD) YASHADA, Pune)
- प्रत्येक लेख पाण्याशी निगडित विविध प्रश्नावर नुस्ते भाष्य करुन थांबत नाहीत, तर तो प्रश्न स्थानिक आणि व्यक्तिगत पातळीवर सोडविण्याच्या दृष्टीने उपलब्ध असणार्या तंत्रज्ञानावरही साधक-बाधक माहिती देतात. - प्रा. नितीन र. करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- मराठीमध्ये पाणीप्रश्नाविषयी सुसंगत, नावीन्यपूर्ण आणि तपशीलवार माहिती देणारे पुस्तक माझ्या पाहण्यात नाही. या पुस्तकाने मराठीतील साहित्यात मोलाची भर घातली आहे. - डॉ. पंडित विद्यासागर, मा. कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
- जलविषयक प्रश्न, समस्या व त्यावरील संशोधन व त्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेले उपाय याबाबतच्या जवळपास १८ भगीरथांच्या प्रयाणगाथा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य व उल्लेखनीय. - आनंद पुसावळे, संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे