शतायुषी दिवाळी अंक... आता नव्या स्वरूपात!
वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध विषयांना स्पर्श करण्याची सुमारे चाळीस वर्षांची परंपरा अभिमानानं मिरवणारा, व्यासंगी वाचकांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातूनही दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणारा,
कै. डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी वसा म्हणून चालवलेला दिवाळी अंक. यंदा नव्या स्वरूपात, तरीही तीच परंपरा पुढे नेत यंदाच्या दिवाळीत प्रकाशित होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातली दैनंदिन गरजेची माहिती, विविध विकारांचं स्वरूप, त्यावरील संशोधन आणि उपाय हे वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोचवण्याचं कार्य ‘शतायुषी’ दिवाळी अंकातून केलं जातं.